Crop Insurance: उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात; यादी जाहीर

Crop Insurance: महाराष्ट्र राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे. खरीप हंगाम 2023  मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या सर्व नुकसानीची भरपाई म्हणून जो उरलेला 75 टक्के पिक विमा आहे. तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे आणि पत्र असणारे सर्व शेतकऱ्यांची यादी देखील जाहीर झालेली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

Crop Insurance Maharashtra

पार्श्वभूमी: 2023 वर्षांमधील महाराष्ट्रातील खरीप हंगामा मधील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर समस्यांना सामोरे जावे लागले होते. त्यामध्ये पावसाचा अनियमित खंड आणि नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावा लागलेली होते.

अशा परिस्थितीमध्येच अनेक शेतकऱ्यांनी विमा योजनेचा अधिकार मार्ग निवडल्याचे पाहायला मिळालेले या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधीच 25% अग्रीम रक्कम जमा करण्यात आलेली असून उर्वरित 75 टक्के रक्कम ही अजून पर्यंत मिळालेली नव्हती. त्यामुळे आता ही जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

पिक विमा वाटपाची प्रक्रिया

पिक विमा वाटपाची प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबविण्यात येते.
पहिला टप्पा 25% अग्रीम रक्कम वितरण करण्यात येते
दुसरा टप्पा यामध्ये उर्वरित 75 टक्के पिक विमा रकमेचे वितरण करण्यात येते.

सध्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली असून ही प्रक्रिया विशेषता त्या राज्यभरामधील भागात राबविण्यात येत आहे. की जेथे 21 दिवसांपेक्षा जास्त दुष्काळ खंड पडलेला होता. अशा सर्व भागांमध्ये पिक विम्याची वाटप करण्यात येत आहे.

लाभार्थी शेतकरी कोण?

महाराष्ट्र राज्य मधील सरासरी 25 जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळालेले होते आणि यामुळे या सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना उरलेल्या 75 टक्के पीक विम्याची जी रक्कम आहे. ती मिळणार आहे. जवळपास सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत अशा प्रकारची माहिती दिलेली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना एक दिलासालायक बातमी मिळत आहे.

महाराष्ट्र सर्वाधिक नुकसानग्रस्त जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य: विमा वाटपामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलेले असून उदाहरणार्थ, काही जिल्ह्यात पिक विमा 75 टक्के रक्कम ही आधीच वाटपासाठी सुरू झालेले आहे. तर काही ठिकाणी अजूनही सुरुवात झालेली नाही त्यामुळे उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पूर्वक 75 टक्के पीक विम्याचे रक्कम लवकरच वितरित करण्यात येणार आहे.

: शेतकऱ्यांना 6,000 रुपये ऐवजी आता मिळणार 18,000 रुपये, नवीन निर्णय पहा

केंद्राच्या परिपत्रका विरुद्ध राज्य शासनाचे पाऊल:

30 एप्रिल 2024 रोजी केंद्र सरकारने एक नवीन जाचक असे परिपत्रक जाहीर केलेले होते या परिपत्रकाच्या विरुद्ध राज्यभरामधील शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकारने एक नवीन परिपत्रक जाहीर केलेले असून शेतकऱ्यांसाठी हितच निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती तिच्याकडे याचिका दाखल करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील अतिक्रियांचे देखील जाहीर करण्यात आलेले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय:

वेळेवर वितरण: राज्य मधील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना पिक विमा वेळेवर वाटप करणे हे राज्य सरकारचे खूप मोठे आव्हान मानले जाते आहे.
पारदर्शक कशी : महाराष्ट्र सरकारने पिक विमा वितरण होते पारदर्शकता राखणे हे देखील सरकार समजले खूप मोठे आव्हान मानले जाते.
तक्रार निवारण कसे: खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळवण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत असतात त्यामुळे त्यांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी देखील सुविधा उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे ठरते.

त्यामुळेच पिक विमा योजनेची अंमलबजावणी देखील योग्य पद्धतीने करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य प्रमाणावर मदत दिल्यावर त्यांना पुढील हंगामासाठी तयार करण्यास देखील मदत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी देखील राज्य सरकारला यश येऊ शकते आणि अशा निर्णयामुळे राज्यभरातील शेती क्षेत्राला चालना आणि गती देखील मिळू शकते. आणि शेतकऱ्यांची सध्या स्थिती सुधारण्यासाठी देखील मदत होते.

Leave a Comment