शिंदे सरकार कडून आता महिलांना प्रत्येक वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत यासंबंधी Mukhymantri Annapurna Yojana ही योजना सुरू करण्यात आलेली असून याचा जीआर जुलै 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला होता. परंतु सध्या या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. आणि यासाठी तुम्हाला सध्या केवायसी करण्यासाठी देखील सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला आपली लवकरात लवकर केवायसी करून घ्यायचे आहे.
लाडकी बहीण योजनेनंतर आता शिंदे सरकारने राबवलेली Mukhymantri Annapurna Yojana ही एक महत्त्वाची महिलांसाठी राबवलेली योजना आहे.
सतत वाढणाऱ्या महागाईमुळे गॅस सिलेंडर किमती ह्या खूपच मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक बजेट हे कोलमडून पडते. यालाच आधार देण्यासाठी शिंदे सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी नक्की कोणकोणत्या महिला पात्र आहेत. ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आणि यासाठी कोणते कागदपत्र लागत आहेत. तसेच मोफत गॅस सिलेंडर नेमकी कशी मिळणार आहेत. अशा प्रकारचे सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत. त्यामुळे व शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या इतर व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करा म्हणजे सर्वांना फायदा होईल.
मतदान कार्ड कसे काढायचे Voter ID Card Apply
Mukhymantri Annapurna Yojana 2024
- योजनेचे नाव – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना
- घोषणा- मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे
- अंमलबजावणी 30 जुलै 2024
- उद्देश- आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या महिलांना मोफत गॅस सिलेंडर प्रदान करणे
- लाभ लाभ कशाप्रकारे- वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देणे
- लाभार्थी कोण?- उज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थी महिला
Mukhymantri Annapurna Yojana Gr PDF
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी महाराष्ट्र सरकारद्वारे दिनांक 30 जुलै 2024 रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
खालील पीडीएफ मध्ये योजनेची सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच लाभार्थ्यांची पात्रता योजनेची कार्यपद्धती यांची सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे आणि यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा यासाठी देखील माहिती देण्यात आली आहे.
Mukhymantri Annapurna Yojana Eligibility Criteria अन्नपूर्णा योजनेसाठी पात्रता निकष
अन्नपूर्णा योजनेसाठी लाभार्थ्यांची पात्रता देखील सांगितलेली आहे तसेच ज्या महिलांनी कशामध्ये असतील त्यांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार असल्याने त्यासाठी तुम्हाला केवायसी करणे देखील बंधनकारक करण्यात आलेले आहे.
- घरगुती गॅस जोडणी महिलेच्या नावाने असावी. ( परंतु सध्या जर पुरुषाच्या नावाने जरी गॅस जोडणी असेल तरीदेखील लाभ मिळत आहे)
- प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना योजनेसाठी पात्र ठरविण्यात आलेले आहे.
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र असणार आहेत.
- प्रति रेशन कार्ड केवळ एक लाभार्थी योजनेसाठी पात्र लाभार्थी म्हणून लाभ घेऊ शकतात.
- 14.2 किलो गॅस सिलेंडरच्या जोडणी वरच मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना फायदे
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना 2024 साठी पात्र असणाऱ्या महिलांना खालील प्रकारे फायदे मिळणार आहेत.
प्रत्येक वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे
गॅसवर शासनाची सबसिडी देखील मिळणार आहे
एका महिन्यात एक मोफत गॅस सिलेंडर घेता येणार आहेत
अन्नपूर्णा योजना अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रेशन कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
Mukhymantri Annapurna Yojana online Apply
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही दोन प्रकारे लाभवली जात आहे याच्या माध्यमातून अर्जदार व्यक्तीला स्वतःहून कोणतीही काम करण्याची गरज भासणार नाही.
या योजनेसाठी ज्या व्यक्ती पात्र ठरणार आहे त्यांची यादी देखील प्रसिद्ध होणार आहे. आणि या यादीमधील या व्यक्तींची नाव समाविष्ट करण्यात आलेले आहेत त्यांना वर्षांमध्ये कधी देखील तीन मोफत गॅस सिलेंडर मिळवता येणार आहेत.
रेशनकार्ड ई- केवायसी करा; अन्यथा रेशन कार्ड होणार बंद! केंद्र सरकारचा मोठा निर्णय Ration Card EKyc Maharashtra
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या महिला पात्र
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी ज्या महिला पात्र ठरलेले आहेत त्यांना या योजनेचा म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ सहजरीत्या घेता येणार आहे.