Ration Card EKyc Maharashtra: मित्रांनो रेशन कार्ड च्या बाबतीत केंद्र सरकारकडून नवीन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. यानुसार तुम्ही आपली ई केवायसी करणे बंधन करण्यात आलेले आहे. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे.
कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या सर्वांची Ration Card EKyc करणे आवश्यक करण्यात आलेले आहे. आणि तुमच्या कुटुंबातील जल सदस्यांची ई केवायसी करणे राहून गेले आहे. अशा सदस्यांची नाव डायरेक्ट रेशन कार्ड मध्ये कमी करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे. एकदा का रेशन कार्ड वर नाव कमी झाले की मग तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे त्यामुळे तुम्ही निष्काळजीपणा अजिबात करू नका या पोस्टमध्ये आपण ही केवायसी विषय सर्व माहिती पाहणार आहोत त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा.
Ration Card EKyc
केंद्र सरकारने इलेक्शन कार्ड मधून मयत व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी ही नवीन ही केवायसी करण्याची प्रक्रिया राबवलेली असल्याने 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत सर्वांनी केवायसी करणे बंधन करण्यात आलेले आहे. जर तुम्ही 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत आपली केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यावी.
सर्वच शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या रेशन कार्ड ची केवायसी करणे बंधन करण्यात आलेले आहे. जे लोक केवायसी करणार नाही त्यांना रेशन दिले जाणार नाही.
केंद्र सरकार हे गरीब आणि कल्याणकारी योजना राबवण्याची काम करत आहे. त्याच्या अंतर्गत मोफत धान्य दिलं जातं मात्र मयत व्यक्तीच्या नावाने खूप मोठ्या प्रमाणात धन्य घेतली जात असल्याची माहिती पुढे येत होती. आणि अशा व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मधून कमी करण्यात येत नसल्यामुळे सरकारकडून ही केवायसी करण्याची अट देखील लागू करण्यात आलेली आहे
मतदान कार्ड कसे काढायचे Voter ID Card Apply
Ration Card EKyc Maharashtra
महाराष्ट्र अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने यासंदर्भात सर्वांना जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे.
ज्या रेशन कार्ड वरती रेशन वस्तू मिळत आहेत. अशा सर्व रेशन कार्डधारकांना सरकारकडून आव्हान करण्यात येत आहे.
कृपया आपण आपल्या कुटुंब सोबत आपल्या रेशन कार्ड मधील जेवढ्या व्यक्ती समाविष्ट आहेत. त्या सर्वांचे रेशन कार्ड घेऊन त्याचे व्हेरिफिकेशन करणे देखील बंधन करण्यात आलेले आहे. अन्यथा ज्या व्यक्तींचे व्हेरिफिकेशन होणार नाही. त्यांचे नावे रेशन कार्ड मधून वगळल्यास किंवा त्यांचे शिधा जिन्नस बंद झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शिधापत्रिका धारकांची राहणार आहे याची देखील नोंद घेणे गरजेचे आहे.
Ration Card EKyc status check
रेशन कार्ड ची ई केवायसी पूर्ण झालेली आहे किंवा नाही. हे तुम्हाला जर तपासायचे असेल तर खालील माहिती स्टेप बाय स्टेप फॉलो करावी.
- सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर ओपन करून मेरा राशन (Mera Ration)हे ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
- यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आरसी नंबर किंवा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे.
- त्यानंतर तुम्हाला खालील सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
- तुम्हाला आधार सीडिंग ऑप्शन शोधायचा आहे
- यानंतर तुमच्या कुटुंबामधील सदस्यांच्या नावाच्या पुढे आधारस्तिदिन एस किंवा नो अशा प्रकारचा पर्याय दिसतो.
- ज्या व्यक्तीच्या नावापुढे yes आहे त्यांना राशन कार्ड ची ई केवायसी करण्याची गरज नाही . परंतु ज्या सदस्यांच्या नावापुढे ईकेवायसी त्यानंतर no ऑप्शन दिसत आहे अशा सर्वांना केवायसी करणे गरजेचे आहे.
Ration Card EKyc कशी करावी?
रेशन कार्ड ची केवायसी कशी करायची हे आपण पुढील प्रमाणे पाहूयात
- सुरुवातीला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे रेशन कार्ड घ्यायचे आहे.
- त्यानंतर तुम्हाला सर्व सदस्यांना घेऊन आपल्या राशन दुकानांमध्ये भेट द्यायचे आहे.
- नंतर तुम्हाला तेथे रेशन दुकान चालकाकडून आपली केवायसी करून घेण्यासाठी सांगायचे.
- तसेच ई केवायसी करत असताना घरामधील सर्व सदस्य हजर असणे देखील आवश्यक आहे आणि त्यांच्या हाताचा अंगठा इ पॉस मशीन वर घेणे देखील खूप गरजेचे आहे.
- Verification पूर्ण झाल्यानंतर कुटुंबामधील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण होईल.
Ration card ekyc last date in Maharashtra
- रेशन कार्ड ची केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2024 असून या तारखेच्या अगोदर तुम्हाला आपल्या रेशन कार्ड ची केवायसी करून घ्यायची आहे. अन्यथा तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे याची नोंद घ्यावी.
रेशन कार्ड एक केवायसी करण्यासाठी सध्या मुदतवाढ देण्यात आलेली आहे. अगोदर 30 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आलेली होती. परंतु आता 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे.