ई पीक पाहणी कशी करायची? मोबाईल वरून अशी करा पिक पाहणी E Pik Pahani Online Process 2024

E Pik Pahani Online Process 2024: मित्रांनो या पोस्टमध्ये आपण ई पिक पाहणी कशी ?याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.कारण की खूप शेतकरी मित्रांकडून प्रश्न करण्यात येत होता. की ई पाहणी आपल्या मोबाईल वरती कशी करायची यावरती माहिती सांगा म्हणून आजची पोस्ट आपण यावरून घेऊन आलेलो आहोत. आणि तरीही तुम्हाला जरी पिक पाहणी करताना कोणतीही अडचण आली तर आपण खाली एक यूट्यूब व्हिडिओ देखील दिलेला आहेत. तो पाहून देखील तुम्ही सहजरीत्या एक पाहणी पूर्ण करू शकतात.

खरीप हंगाम पिक विमा भरण्याची मुदत ही आता सध्या संपलेली असल्यामुळे सरकारकडून सध्या ई पीक पाहणी ही ऑनलाईन करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच्या माध्यमातून तुम्ही पीक पाहणी करू शकतात.

ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 च्या पिक विमा भरलेला असेल त्यांना ई‌ पिक पाहणी करणे हे सध्या सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे. ही पाहणी केली नाही. तर पिक विमा भेटत नाही त्यामुळे जर तुम्हाला पिक विमा हवा असेल तर तुम्हाला ई पी पाहणी करणे देखील अनिवार्य करण्यात आलेले आहे. आणि सध्या ई पीक पाहणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. त्यामुळे केवळ तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये ई पिक पाहणी सहजरीत्या करता येत आहे.

प्रधानमंत्री सूर्य घर योजना 2024: मोफत सोलर पॅनल मिळवा; ऑनलाइन अर्ज सुरू 

मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने ई पिक पाहणी कशाप्रकारे करायची आहे आपण सर्व सविस्तर माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे माहिती आवडल्यास आपले मित्रांना आणि तुमच्या इतर व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करत जा. ई पीक पाहणी करणे ही अत्यंत सोपी प्रक्रिया असल्याने तुम्ही केवळ ५ मिनिटं वेळ काढून देखील ही पोस्ट वाचून सहजरित्या आपली पिक पाहणी करू शकतात.

E Pik Pahani Online process 2024

  • ई पीक पाहणी करण्यासाठी सुरुवातीला E Pik Pahani App Download करायचे आहे.
  • या https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova लिंक वरून तुम्ही पिक पाहणी ॲप डाऊनलोड करू शकतात.
  • ॲप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला ॲप ओपन करायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे.
  • यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून लॉगिन करा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे.
  • तुमचा चालू मोबाईल नंबर‌तुम्हाला लॉगिन करायचे आहे हे ध्यानात घ्या.
  • तुमचा विभाग, जिल्हा, तालुका, आणि गाव तुम्हाला तिथे निवडून घ्यायचे आहे.
  • तुम्हाला इतर आवश्यक माहिती भरायचे आहे आणि शोधा या बटनावर क्लिक करून तुम्हाला खाते निवडा यावरती क्लिक करायचे आहे.
  • खाते ओपन झाल्यानंतर त्यामध्ये पीक पाहणी ची माहिती प्रविष्ट करा, शेतात जे पीक लावलेले आहे ते पीक निवडाचे आहे.
  • पुढील प्रमाणे ची माहिती तुम्हाला विचारली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक भरून घ्यायचे आहे.
  • प्रतिक्षा शेतामध्ये तुम्हाला जायचे आहे आणि त्यानंतर सातबारा नुसार ही पिक पाहणी करून घ्यायची आहे.
  • यामध्ये शेती पिकाचे शेतातील लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचे आहेत, मध्ये तुम्हाला अक्षांश आणि रेखांश बरोबरच तुमच्या शेतातचे व्यवस्थित निवडायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या शेतामधील उभे असलेल्या पिकाचा फोटो अपलोड करायचा आहे. आणि मित्रांनो ही पिक पाहणी करत असताना तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि यामध्ये कोणतीही माहिती चुकून द्यायची नाही.
  • जेवढी तुमच्या नावावर ती जमीन आहे त्यानुसार तुम्हाला ही पिक पाहणी प्रोसेस ही पिक पाहणी करून घ्यायचे आहे.
  • एकदा तुम्ही पिकाचे फोटो अपलोड केले की नंतर E Pik Pahani Online application submit यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायच

E Pik Pahani last date 2024

खरीप हंगाम 2024 साठीची ई पिक पाहणी ही 1 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेली असली तरीही यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. आणि यामध्ये खूप वेळा बदल देखील करण्यात आलेला असून शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 करण्यात आलेली होती. परंतु यानंतर देखील फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अधिकच कालावधी वाढवून देण्यात आलेला आहे.

E Pik Pahani Online App Link

https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova

अशाप्रकारे मित्रांनो तुम्हाला आपली ई पिक पाहणी कशाप्रकारे करायची हे समजलेले असेल त्यामुळे माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना आणि आपल्या इतर व्हाट्सअप ग्रुपला देखील नक्की शेअर करा.

Leave a Comment