Ladki Bahin Yojana New Rules Today : राज्यभरामधील लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांची संख्या ही जवळपास अडीच कोटींच्या आसपास पोहोचलेली आहे. आणि लडकी बहीण योजनेचे निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांची संख्या ही देखील खूप मोठी असल्याचे पुढे येत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना अपत्र घोषित करण्यासाठी उपाय योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. या योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी आणि सरकारने निवडणुकीदरम्यान 2100 रुपयांचा हप्ता देण्याची हमी दिलेली असल्याकारणाने बोगस लाभार्थ्यांना या योजनेतून बात करण्यात यावी या उद्देशाने तसेच सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडू नये यासाठी सरकारकडून सध्या नवीन पाऊल उचलण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojana New Rules Today
आता प्रत्येक गावातील अंगणवाडी सेविका हा प्रत्येक घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहेत. तसेच जर लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून ज्या महिलेच्या घरी चार चाकी गाडी असेल तर त्यांना आता “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा” लाभ मिळणार नाही कारण की चार फेब्रुवारी पासून महिला पर्यवेक्षक तसेच अंगणवाडी सेविका ह्या घरोघरी जाऊन अर्जाची पडताळणी करणार आहे. तसेच जर या पडताळणीमध्ये चार चाकी तुमच्या कुटुंबांमधील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असल्याचे आढळले तर तुम्हाला थेट या योजनेच्या लावा पासून अपात्र ठरविण्यात येणार आहे.
घरी जाऊन चार चाकी वाहनांची पडताळणी करण्याचे सरकारचे आदेश
पुणे जिल्ह्यामधील 21 लाख 11 हजार 900 लाडक्या बहिणींना अर्ज करण्यात आलेले आहेत. त्या सर्व महिलांच्या घरी चार चाकी वाहने आहेत की नाही याची पडताळणी सुरू केली जात आहे. त्यानंतर चार चाकी वाहन असलेल्या लाडक्या बहिणींना या योजनेतून अपात्र ठरविण्यात येईल तसेच 3 फेब्रुवारी 2025 रोजी महिला आणि बालकल्याण विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांनी संपूर्ण राज्य परिवारातील सर्व अधिकाऱ्यांना लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत त्यांच्या घरी जाऊन चार चाकी वाहन आहेत. की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहे. आणि वाहतूक विभागाकडून देखील वाहन मालकांची यादी घेऊन प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या घरी चार चाकी वाहने आहेत. त्यांनी स्वतःहूनच योजनेचा लाभ सोडावा अशा प्रकारची माहिती नुकतीच महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी कोणते निकष आहेत?
- लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी चे वय हे 21ते 65 दरम्यान असावे. आणि योजना सुरू केली तेव्हा 21 ते 60 अशा प्रकारची वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली होती.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या आत मध्ये असावे.
- कुटुंबामधील कोणतीही व्यक्ती जर सरकारी नोकरीमध्ये असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही. तसेच आयकर भरणारे व्यक्ती देखील या योजनेसाठी अपात्र आहेत.
- संजय गांधी निराधार योजने सारख्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असले या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
- चार चाकी वाहने ज्या महिलांच्या घरी आहेत अशा महिलांना लाडकीभेनि योजनेचा लाभापासून वंचित रहावे लागणार आहे. (Ladki Bahin Yojana New Rules Today)
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
विभक्त /वेगळ्या झालेल्या लाडके बहिणींना मिळणार लाभ
न्यूज चॅनल च्या मिळालेल्या माहितीनुसार, जर चर्चा किंवा हान हे सासू मेव्हणे किंवा कुटुंबामधील इतर कोणत्याही सदस्यांच्या नावावर असेल तर लाभार्थी महिला व तिचा पती आणि मुलांपासून वेगळी राहत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा लाभास सुरूच राहणार आहे.
आणि लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना स्वतःहून लाभ सोडण्याचं आव्हान देखील करण्यात आलेली आहे. आणि यानंतर देखील लाभार्थी महिला लाभ सोडत नसतील तर अशा प्रकारचे माहिती शासनाच्या किंवा इतर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास अशा लाडक्या बहिणींवर प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील अशी माहिती देखील सध्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. ( Ladki Bahin Yojana New Rules Today )