Ladki Bahin Yojana: नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? असा प्रश्न सध्या खूप मोठ्या प्रमाणात विचारण्यात येत आहे. याविषयीची विधानसभेमध्ये अधिवेशनात याबद्दल काही चर्चा चालू आहे ही अशी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूयात.
राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये वाढवणे संबंधी कोणती मोठी घोषणा होणार का? याविषयी विचारणा केली असता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय उत्तर दिले आहे. ते देखील आपण येथे पाहू यात. ( Ladki Bahin Yojana Beneficiary Status )
लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात येणार आहेत की नाही? असा सवाल काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार यांनी माहिती सरकारला केलेला होता. तर रोहित पवार यांनी लाडकी बहिण संबंधी केलेल्या या प्रश्नाला उत्तर देत असताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणीच कोणतीही फसवणूक होणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महिलांच्या हिताचा आणि योग्य निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे.
निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना १५०० रुपयाने ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार असं सरकारने अगोदर सांगितलेलं होतं. तर तुम्ही या अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहात? की नाही? असा सवाल रोहित पवार यांनी काल सभागृहामध्ये उपस्थित केलेला होता. यावरती महायुती सरकारने ही महत्वपूर्ण योजनेबद्दल बोलत असताना 2100 रुपयांचा हप्ता देण्यासंबंधी निर्णय सरकार घेणार आहे. आणि महिलांच्या आयुष्यातील हा आनंद असाच टिकणार आहे. लाडक्या बहिणीची कोणतीही फसवणूक होणार नाही. याची दक्षता माहिती सरकार निश्चितपणे घेणार आहे. अशी अदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे. ( Ladki Bahin Yojana Beneficiary Status )