Crop Insurance: नैसर्गिक आपत्तीमुळं अनुष्का झालेली असल्यास केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. पिक विमा अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची स्थिती कशाप्रकारे चेक करायचे बद्दल सर्व माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Crop Insurance Maharashtra 2025
पिक विमा अर्ज मंजूर झालेला आहे का? पॉलिसी स्टेटस काय आहेत? आणि क्लेम किती आणि कधी मिळणार आहे? कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये किंवा एजंटच्या कडे तुम्हाला आता जाण्याची गरज पडणार नाही. मग आता हे तुम्ही आपल्या मोबाईल वरून देखील चेक करू शकता त्यामुळे आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
पिक विमा अर्ज स्टेटस कसे तपासायचे? पुढील प्रमाणे
1) सर्वात प्रथम तुम्हाला 7065514447 हा पी एम एफ बी वाय हा चॅट बोट क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये सेव करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप मध्ये जाऊन या नंबर वर हाय असा मेसेज पाठवायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमचे पॉलिसी टेटस क्लेम स्टेटस लॉस एस्टिमेशन प्रीमियर कॅल्क्युलेशन अशा प्रकारचे तेथे उपलब्ध होतात.
2) मित्रांनो येथे पॉलिसी ते चेक करण्यासाठी तुम्हाला ते त्या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आणि रब्बी किंवा खरीप यापैकी हंगामाची निवड करायची आहे. म्हणजेच की तुम्ही खरीप 2024 किंवा रब्बी 2024 हंगाम निवडलेला असेल तर तुम्हाला तुमच्या पीक विम्याची सविस्तर माहिती मिळवून जाईल.
3) यामध्ये तुमचा पिक विमा पॉलिसी चा नंबर, अर्ज क्रमांक, गावाचे नाव पिकाचे नाव सर्वे नंबर विम्याची तुम्ही किती रक्कम भरले आहे विमा कोणत्या कंपनीचा काढलेला आहे. तुमच्या हप्त्याची माहिती आणि पॉलिसीचे रक्कम अशा प्रकारचे स्टेटस तुम्हाला तिथे पाहायला येतो. तर हे पाहिजे असेल तर तुम्हाला क्लेम स्टेटस या पर्यायवर क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर अर्ज क्रमांक आणि क्लेम टेटस ची माहिती सहजरीत्या तुम्हाला तिथे पाहता येणार आहे.